Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा-उत्तम दिघे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा-उत्तम दिघे

२ ऑगस्ट रोजी सोमेश्वरनगर येथे होणाऱ्या शिबिरात महसूल विभागाच्या विविध योजना, प्रमाणपत्रे, सातबारा दुरुस्ती, आरोग्य तपासणी व शासकीय सेवांचा एकाच ठिकाणी लाभ घेण्याचे आवाहन

marathinews24.com

बारामती – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे २ ऑगस्ट रोजी शरदचंद्र पवार कॉलेज इंजीनियरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी सोमेश्वर नगर येथे समाधान शिबीराचे आयोजन करावे, या शिबारात अधिकाधिक नागरिकांनी लाभ देण्याची कार्यवाही करावे, असे निर्देश आवाहन उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिले. या शिबिरात नागरीकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

सायबर सुरक्षा तंत्रज्ञान शिक्षण ही काळाची गरज – डॉ पराग काळकर – सविस्तर बातमी 

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सचिन यादव, तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दिघे म्हणाले, महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबधित दैनंदिनी प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्यादृष्टीने शिबीर अत्यंत महत्वाचे आहे. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र तसेच गावठाणातील नागरिकांना स्वामित्व देण्याबाबत सनद वाटप करणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमीनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा, जिवंत सातबारा मोहिम, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी विशेष तरतुद, कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपारिक व्यवसायासाठी सवलती, शेतजमीनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पुर्णपणे माफ तसेच ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, शिधापत्रिका वाटप करणे.

ते पुढे म्हणाले, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, 7/12 अभिलेख दुरुस्ती, अकृषक तरतुदी सुधारणा, कमी जास्त पत्रके तयार करणे, ई मोजणी, शेतकरी ओळखपत्र तसेच महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्राचे वाटप करणे, आधारकार्ड दुरुस्ती, भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर, एनसीएमसी कार्ड वाटपाबाबत एसटी महामंडळाच्यावतीने शिबिराचे आयोजन आदींबाबत करण्याबाबत सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करणे बाबत दिशानिर्देश दिलेले आहेत, त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना दिघे यांनी दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×