Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कात्रज येथील प्राणी संग्रहालयातून चंदनाची झाडे चोरीचा प्रयत्न

कात्रज येथील प्राणी संग्रहालयातून चंदनाची झाडे चोरीचा प्रयत्न

महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांनी काढला पळ

marathinews24.com

पुणे – शहरातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी झाडे कापून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुरक्षा जवान श्रीपती देवीदास कसबे (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परदेशी चलन देण्याच्या आमिषाने साडेसात लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या आवारात मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी आवरातील चंदनाची चार झाडे कापून नेण्याचा प्रयत्न केला. गस्तीवर असलेले सुरक्षा जवान श्रीपती कसबे, अमोल चोपणे, गणेश पवार, अमोल उदमले, विशाल मार्कंडे, प्रशांत सुपेकर, शकिर शेख यांना चोरटे आल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु अंधारचा फायदा घेत चोरट्यांनी पळ काढला. यापूर्वी प्राणी संग्रहालयाच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी प्राणीसंग्रहालयास भेट दिली असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

कात्रज प्राणी संग्रहालय येथे नुकतेच महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. जवानांच्या कामगिरीमुळे पोलीस दलाकडूनही कौतुक केले जात आहे. पुढील काळात चोरट्यांवरती नक्कीच आळा बसेल असा विश्वास जवानांनी यावेळी बोलताना दिला. प्राणीसंग्रहालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेेरे बसविण्यात आले आहेत. चित्रीकरण तपासून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×