दुचाकीच्या पार्किंगच्या वादातून खुनाचा प्रयत्न
marathinews24.com
पुणे – पार्किंगच्या वादातून चाकूने वार करून तिघांवर खुनी हल्ला करत गंभीर जखमी केल्याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना भवानी पेठेतील हरकानगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली होती. दहशत पसरविणार्या दहा ते बारा जणांच्या टोळक्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भाडेकरूंची माहिती देण्यास टाळाटाळ, दोन घर मालकांवर गुन्हा दाखल – सविस्तर माहीती
रिहान शेख (वय १८ ), हुसेन शेख (वय ३८), नफीसा शेख (वय ३५), रूकसार शेख (वय ३७), शाहीन शेख (वय ५४), आफरीन शेख (वय ३५), तब्बसूम शेख (वय ५६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोन महिन्यापूर्वीच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. भवानी पेठेत राहणार्या ३८ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेत दि. ३० एप्रिलच्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा आयान हा दुचाकी हरकानगरात पार्क करत होता. त्यावेळी टोळक्याने त्याला येथे पार्किंग करायची नाही असे सांगितले. त्यानंतर दुचाकीला लाथा मारून खाली पाडून त्यांना मारहाण केली. यावेळी फिर्यादीचे नातेवाईक व मुलगा आयन असे त्यांना जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी जमाव जमवून फिर्यादीचा भाऊ रिझवानला मारहाण केली. आयानवर चाकुने वार करत खुनाचा प्रयत्न केला. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हर्षल कदम करत आहेत.