Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण

marathinews24.com

पुणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन – लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे १६ जुलै रोजी निधन झाले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केसरीवाडा येथे टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी स्वर्गीय दीपक टिळक यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, स्वर्गीय दीपक टिळक यांचे पुत्र रोहित टिळक, स्नुषा प्रणति टिळक, मुलगी गीताली टिळक, नातू रौनक टिळक आदी उपस्थित होते.

महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करू- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे – सविस्तर बातमी 

शिंदे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे दुःखद निधन झाले असून आपल्या सर्वांसाठी ही अतिशय दुःखद घटना आहे. डॉ. टिळक यांनी संपादक म्हणून काम पाहिले असून त्यांच्या निधनाने पत्रकारिता, साहित्य, मराठी संस्कृतीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्राच्या माध्यामातून दिलेल्या लढ्याचा वारसा टिळक परिवार पुढे नेत आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असेही शिंदे म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×