Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त शारदानगर येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न

ग्राहक संरक्षण कायदा, ऑनलाइन फसवणूक व तक्रार निवारण प्रणालीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

marathinews24.com

बारामती – जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्ताने तहसील कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (१० एप्रिल) रोजी अँग्रीकलचर डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विधान भवनात महात्मा फुले द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभी कृतज्ञतापूर्वक अभिवादन – सविस्तर बातमी

यावेळी पंचायत समिती बारामती गटविकास अधिकारी किशोर माने, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. तुषार झेंडे पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका अध्यक्ष संजीव बोराटे, बारामती तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी तितिक्षा बारापात्रे यांच्यासह अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ग्राहक संरक्षण परिषदेचे पदाधिकारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

ॲड. झेंडे पाटील म्हणाले, ‘ग्राहक संरक्षण कायद्याची पार्श्वभूमी, अंमलबजावणी तसेच राष्ट्रीय ग्राहक मंच तक्रार प्रणाली आणि ई-कॉमर्स प्रणाली खरेदी करतांना फसवणूक झाल्यास ग्राहकांना तक्रार करण्याविषयी मार्गदर्शन केले. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या फसवणूकी पासून सर्वांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.

बारापत्रे यांनी ग्राहकांच्या हक्कांच्या सोबतच विक्रेत्यांचे कर्तव्याबाबत मार्गदर्शन केले. श्री. दिलावर तांबोळी यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल बेलदार व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सचिव महेश पवार यांनी केले. प्राचार्य सचिन खलाटे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×