Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

गोल्फ क्लबमधून उडालेला चेंडू दुचाकीस्वाराच्या जिवावर, येरवडा पोलिसांत तक्रार दाखल

गोल्फ क्लबमधून मारलेल्या चेंडूने दुचाकीस्वार गंभीर जखमी – येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Marathinews24.com

पुणे- नागरिकांनो सावधान तुम्ही जर येरवड्यातील गोल्फ क्लब परिसरातून प्रवास करीत असल्यास खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा पिस्तूलातील गोळीपेक्षाही भेदक वेगाने चेंडू येउन तुम्हाला गंभीर जखमी करू शकतो. त्यामुळे हेल्मेटसह अंगरक्षणाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. अशाच एका चेंडूमुळे चक्क दुचाकीस्वार तरूणाच्या छातीत लागल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला आहे.

गाडीवरचे नियंत्रण सुटले अन झाला अपघात – सविस्तर बातमी
गोल्फ क्लबमधून मारलेला चेंडू दुचाकीस्वार तरुणाच्या छातीवर आदळल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यामुळे दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोल्फ क्लब व्यवस्थापन, तसेच अज्ञाताविरुद्ध दुखापत केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रणील अनिल कुसळे (वय ३५, रा. येरवडा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कुसळे आणि त्यांचे मित्र संदीप भातकर यांच्यासोबत २९ मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास येरवड्यातील उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्यावेळी गोल्फ क्लबमधून गोल्फ खेळताना मारलेला चेंडू त्यांच्या छातीवर आदळला. त्यानंतर चेंडू तेथून जाणार्‍या एका वाहनावर आदळला.   घटनेत कुसळे यांच्या छातीला दुखापत झाली. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.ह याप्रकरणी कुसळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार रेड्डी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×