Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Baramati RTO Fancy Number Booking : खाजगी संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी एमएच ४२ बी झेड क्रमांकाची नवीन मालिका

Pune RTO Fancy Number Auction 2026

आकर्षक आणि पसंतीचे वाहन क्रमांक मिळविण्याची संधी; ५ आणि ६ नोव्हेंबरला अर्ज स्वीकारणार

marathinews24.com

बारामती – Baramati RTO Fancy Number Booking : खाजगी दुचाकी संवर्गातील वाहनांसाठी बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे “एमएच ४२ बी झेड ” क्रमांकाची नवीन मालिका सुरु करण्यात येणार असून आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या खाजगी चारचाकी वाहनांसाठी तिप्पट रक्कम भरुन आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेच्यादरम्यान धनाकर्षासह (डी.डी.) विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी त्याच दिवशी सायं ४.३० वाजता कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल.

पुण्यात तुळशीबागेतील व्यापाऱ्यांकडून वंचित मुलांची दिवाळी – सविस्तर बातमी 

यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डी.डी. जमा करावयाचा असेल त्यांनी दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता संबंधित अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा धनाकर्ष भरलेल्या व्यक्तीस नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.

दिनांक ६ नोव्हेंबर रोजी केवळ खाजगी दुचाकी संवर्गातील वाहनांकरिता आकर्षक तसेच पसंती क्रमाकांचे विहित शुल्कासह अर्ज सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारले जाईल. एकाच क्रमांकाकरीता अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी दिनांक १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत जमा करता येईल. (Baramati RTO Fancy Number Booking) त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात उपस्थित पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल.

अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र तसेच पॅनकार्डची स्वाक्षांकित प्रत आणि “DY RTO, BARAMATI” या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा बारामती येथील धनाकर्ष असावा. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यानी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×