Breking News
Mahatma Jyotirao Phule : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे आवाहनKharadi Bypass Robbery Case : पादचारी जेष्ठेच्या अंगावर पाणी उडवून लुटलेLost Mobile Recovery : वाघोली पोलिसांनी तक्रादारांच्या चेहर्‍यावर फुलवले हसूPune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटनाBopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळलीSugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रम

Beed Farmer Suicide : कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

Beed Farmer Suicide

बीड जिल्ह्यातील येवता येथील घटना

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – शेतात पीक आले नाही, आता पतसंस्थेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे ? या विंवेचनातूनपिके करपून गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या ३५ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या  (Beed Farmer Suicide) केली. ही धक्कादायक घटना येवता (ता केज जि. बीड) येथे घडली आहे. केशव वाघमारे असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे.

गळफास घेण्याच्या प्रयत्नातील तरूणाचे अग्निशमन दलाने वाचवले प्राण – सविस्तर बातमी

केशव विष्णुपंत वाघमारे (वय ३५ वर्षे ) यांनी एका वर्षांपूर्वी शिवराम ग्रामीण पतसंस्थेचे कर्ज घेतले होते. यंदा दुष्काळामुळे पाऊस नसल्याने आणि शेतातील पीक न आल्यामुळे पतसंस्थेचे कर्ज कसे फेडायचे, शेतातून उत्पन्न काहीच निघणार नाही, या विचारातून चिंताग्रस्त झालेल्या शेतकरी वाघमारे यांनी दि.१५ सप्टेंबरला रात्री आठ वाजता टोकाचे पाऊल उचलले. (Beed Farmer Suicide) त्यांनी विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र दरम्यान १६ सप्टेंबरला पहाटे तीन वाजता उपचार सुरू असताना केशव वाघमारे यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दि २९ सप्टेंबरला त्यांचे मोठे भाऊ पुरुषोत्तम वाघमारे यांनी दिलेल्या या माहितीवरून केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार बाबजी दराडे हे करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×