जवानांनी मानवी मनोरा करून केली सुटका
marathinews24.com
पुणे – शहरातील स्वारगेटमध्ये लक्ष्मीनारायण चौक परिसरात झाडावर चढून गळफास घेऊन खाली लटकलेल्या तरुणाचे अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान प्राण वाचवले. (Swargate Fire Brigade Rescue) मानवी मनोरा तयार करून सुमारे १८ ते २० फूट उंचीवर पोहोचत नायलॉनची दोरी चाकूच्या साहाय्याने कापून तरुणाला खाली उतरवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. उमेश गोकुळ मिरगणे (रा. शंकर महाराज मठ परिसर) असे या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (१ ऑक्टोबर) दुपारी ही घटना घडली.
हडपसरमध्ये जुन्या वादातून दोघांवर वार, टोळक्याला अटक – सविस्तर बातमी
आत्महत्येचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचताच व जवान गाडीतून खाली उतरेपर्यंत २० फुट उंच झाडावर चढलेल्या उमेशने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. यावेळी अग्निशन दलातील अधिकारी अमोल कर्डेकर, तांडेल राजेश कांबळे, चालक हातमोडे तसेच जवान विक्रम गायकवाड, जयेश गांगोडा, अमित रासकर आणि अथर्व काटे यांच्या पथकाने क्षणाचाही विलंब न करता गाडीतून उतरून झाडाकडे धाव घेतली. (Swargate Fire Brigade Rescue) जवानांच्या साह्याने मानवी मनोरा तयार करून दोरीला लटकत असलेल्या उमेशचे पाय पकडले. क्षणात जवानाने तरुणाने घेतलेल्या गळफासाची रस्सी कापली. त्यानंतर उमेशला सुरक्षीतपणे खाली उतरवले.
तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याची प्रकृती सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक परतले. उमेशला खाली उतरवण्यासाठी काही सेकंदाचा विलंब जरी झाला असता तर त्याचा जीव धोक्यात गेला असता. जवानांच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसी प्रयत्नांमुळे हा जीव वाचला.





















