टोळक्याला अटक
marathinews24.com
पुणे – Hadapsar Assault Case : जुन्या भांडणाच्या वादातून तरूणासह त्याच्या मित्रावर वार करुन जीवघेणा हल्ला झाल्याची घटना २९ सप्टेंबरला रात्री पावणेअकराच्या सुमारास हडपसरमधील गोंधळेनगरातील होले हाईटस जवळ घडली आहे. याप्रकरणी तिघाजणांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मृणाल जाधव वय २० रा. कात्रज असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार ओमकार अनिल ताकवले (वय १९ रा. हडपसर) ओमकार शिवाजी सावंत (वय १९, रा. भेकराईनगर, हडपसर) सिद्धार्थ सरणाप्पा मोरे (वय ३० रा. हडपसर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सिनिअर सिटीझन कार्डची बतावणी, जेष्ठाला १० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मृणाल जाधव आणि आरोपीमध्ये काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याच भांडणाच्या रागातून आरोपींनी साथीदारांना बोलावून घेतले. २९ सप्टेंबरला रात्री पावणे अकराच्या सुमारास जाधव हा मित्रासोबत गोंधळेनगरातून जात होता. त्यावेळी टोळक्याने दोघांना अडवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी हत्याराने वार केला. Hadapsar Assault Case लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. त्यानंतर टोळके पसार झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनोद साने तपास करीत आहेत.
कोथरुडमध्ये घरफोडी, साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला
बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून ३ लाख ४० हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना २८ ते २९ सप्टेंबर कालावधीत कोथरुडमधील गांधीभवन रोड परिसरातील श्री गणेश अर्पाटमेंट मध्ये घडली आहे. याप्रकरणी एकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटुंबियासह श्री गणेश अपार्टमेंटमध्ये राहायला असून, २८ ते २९ सप्टेंबर कालावधीत ते बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील ४० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून ३ लाख ४० हजारांचा ऐवज चोरुन नेला. गावाहून आल्यानंतर तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले तपास करीत आहेत.






















