Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

कन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्न

कन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्न

मधमाशांचे संवर्धन व संगोपन करणे काळाची गरज-उपविभागीय कृषि अधिकारी तुळशीराम चौधरी

marathinews24.com

पुणे – मानवी आयुष्यासाठी मधमाशांचे उपयुक्तता लक्षात घेता त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, मधमाशी व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीसह आत्मनिर्भर होण्यासही मदत होत आहे, या व्यवसायाकरिता कृषी विभागाच्यावतीने सर्वतोत्परी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपविभागीय कृषि अधिकारी तुळशीराम चौधरी प्रशिक्षणसत्राच्या उद्धाटनप्रसंगी केले.

“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, राष्ट्रीय मधमाशी मंडळ नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय बारामतीतर्फे आयोजित सात दिवसांचे निवासी मधुमक्षिका पालन प्रशिक्षण तालुका फळरोप वाटिका बारामती कन्हेरी येथे संपन्न झाले.

यावेळी राष्ट्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्य प्रशिक्षक हेमंतकुमार डूमरे, राहुल काळे, उप कृषि अधिकारी प्रतापसिंह शिंदे बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रशांत गावडे, अल्पेश वाघ यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. मधुमक्षिका पालन प्रशिक्षण 21 ते 27 जुलै 2025 या कालावधीत आयोजित करणेत आले होते. सदर प्रशिक्षणामध्ये काटेवाडी, देऊळगाव रसाळ, पिंपळी, कटफळ व जैनकवाडी येथील शेतकरी बांधवानी सहभाग नोंदवून मधुमक्षिका पालनविषयी तांत्रिक मार्गदर्शन घेतले.

या प्रशिक्षणादरम्यान श्री. डूमरे यांनी मधमाशी पालन-शेतीपूरक व्यवसाय, मधमाशी पालनाचे मुलतत्व, पिक उत्पादन वाढीमध्ये मधमाशीचे महत्व, शाश्वत शेतीमध्ये परागीभवनाकरिता मधमाशीची भूमिका, मधमाशी हंगामी व्यवस्थापन, दर्जेदार राणीपालन तंत्रज्ञान, डंख विरहित मधमाशी पालन तसेच मधमाशी वसाहतीचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन आदी विषयावर चलचित्रफितीच्या तसेच प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अभ्यास दौऱ्यावेळी संस्थेचे श्री. काळे यांनी प्रशिक्षणार्थीना मधमाशी पालनाकरिता लागणाऱ्या सामुग्रींची ओळख, शुद्ध मध तयार करण्याची प्रक्रिया प्रात्याक्षिके, मध संकलन व विक्रीबाबत मार्गदर्शन केले. श्री. वाघ यांनी मधमाशीच्या विविध प्रजाती व त्यांचा जीवनक्रम तसेच मधमाशी हाताळणी, परिसरात घ्यावयाची पिके याविषयी मार्गदर्शन केले. श्री. शिंदे ‘यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली’ विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीच्या शंका निरसन करण्यात आले. मध उत्पादक व्यावसायिक रोहन शेळके व तुषार बंडगर यांनी मध व्यवसाय, व्यवसायातील अडचणीं तसेच शासकीय अनुदान प्रक्रिया, मधापासून उत्पादित होणाऱ्या पदार्थांविषयी मार्गदर्शन केले. श्री. चौधरी यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×