Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

भारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम

भारती विद्यापीठ 'आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम

नवीन शैक्षणिक वर्षास उत्साहात प्रारंभ

marathinews24.com

पुणे – भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी) मध्ये बीबीए,बीसीए अभ्यासक्रमाच्या नव्या तुकडीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘आरंभ-२०२५’ या इंडक्शन प्रोग्राम ला चांगला प्रतिसाद मिळाला. दि. २८ जुलै २०२५ रोजी प्रारंभ झाला आणि ५ ऑगस्ट पर्यंत तो टप्प्या टप्प्याने चालणार आहे. विद्यार्थ्यांच्या नव्या तुकडीच्या पायाभरणीसाठी शैक्षणिक,कारकिर्दविषयक समुपदेशन आणि क्रीडा,आरोग्य तपासणी, ग्रीन वॉक,खेळ,उद्योग भेट,रॅगिंग बाबत जागृती अशा विविध गोष्टिंचे आयोजन करण्यात आले आहे. भारती विद्यापीठाच्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम सुरु आहे.

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीस – सविस्तर बातमी 

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम ,भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता कदम, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) चे संचालक डॉ. अजित मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते..कॅप्टन पूजा मेहरा, कार्तिकेय चतुर्वेदी(अमेझॉन), संजय कुलकर्णी(टोयोटा) व्याख्याते नरेंद्र बऱ्हाटे, पूजा भाले, रेशू अगरवाल, सुचित्रा रॉय आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.डॉ.योगेश गुरव,डॉ.स्वाती देसाई, डॉ.सुचेता कांची,डॉ.विजय फाळके,डॉ.हेमा मिर्जी,दीपक नवलगुंद,डॉ.विजय फाळके, डॉ.हेमा मिर्जी व बीबीए-बीसीए चे प्राद्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ.अजित मोरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की विद्यार्थ्यांनी उद्दीष्टांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्ञान ही यशाची गुरुकिल्ली आहे. आज विद्यार्थी कठोर परिश्रम आणि सामूहिक काम करण्यास तयार असावा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर टाळावा.उपप्राचार्य डॉ.आर.व्ही.महाडिक यांनी स्वागतपर भाषणात विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×