Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

हडपसर परिसरातील रुग्णालयात बाॅम्बसदृश वस्तू सापडली

बाॅम्ब शोधक पथकाकडून जिलेटिनच्या कांड्या निकामी

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी बाॅम्बसदृश वस्तू सापडल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच बाॅम्बशोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासणीत बाॅम्बसदृश वस्तूत जिलेटिनच्या कांड्या आढळल्या. पोलिसांच्या पथकाने त्या सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी केल्या. हडपसर भागात खासगी रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या प्रसाधनगृहात बाॅम्बसदृश संशयास्पद वस्तू एकाने सायंकाळी पाहिली. त्याने या घटनेची महिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.

‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे धागेदोरे पुण्यात – सविस्तर बातमी

बाॅम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस), हडपसर पोलीस, तसेच अग्निशमन दलाचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयाच्या परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली. त्यानंतर बाॅम्बशोधक पथकाने संशयित वस्तूची तपासणी केली. तेव्हा त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. जिलेटिनच्या कांड्या सुरक्षित ठिकाणी हलवून त्या निकामी करण्यात आल्या. दरम्यान, या घटनेनमुळे रुग्णालयाच्या परिसरात घबराट उडाली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×