Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे धागेदोरे पुण्यात

बिबवेवाडीतील महिलेसह अभियांत्रिकीतील विद्यार्थी ताब्यात

marathinews24.com

पुणे – ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुट प्रकरणाच धागेदोरे पुण्यापर्यंत पोहाेचले आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागातून एका ब्युटीपार्लर चालक महिलेसह अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांला बुधवारी ताब्यात घेतले. ‘या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेला केद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात देण्यात आले आहे. अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याकडे चौकशी सुरू आहे’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

येरवड्यातील मनोरुग्णालयात तरुणाची आत्महत्या – सविस्तर बातमी

‘‘नीट’ प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाची व्याप्ती देशभरात असून सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास सूरू आहे सीबीआयच्या पथकाने पुणे पोलिसांना काही सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली’, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले. सीबीआयच्या पथकाने अहिल्यानगरमधील राहुरी परिसरातून धनंजय लोखंडे (वय २६ ) याला ताब्यात घेतले. त्यानंतर लोखंडे यांच्या संपर्कात बिबवेवाडीतील ब्युटीपार्लर चालक महिला मनीषा वाघमारे आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांचा शोध घेणे, त्यांच्याकडून पैसे घेऊन ते संबंधित आरोपींविरुद्ध पोहोचविण्यात वाघमारे आणि संबंधित विद्यार्थी सामील असल्याची शक्यता पोलिसंनी व्यक्त केली.

तपासात लोखंडे हा मुख्य संशयित आरोपी असल्याची माहिती मिळाली. गेले चार ते पाच वर्ष तो पुण्यातील वाघोली भागात वास्तव्य करत होता. मंगळवारी पुणे पोलािसांनी त्याचा पत्ता शोधून काढला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच तो पसार झाला. मध्यरात्री त्याला राहुरी परिसरातून सीबीआयच्या नाशिक पथकाने ताब्यात घेतले. तपासात लाेखंडे हा मनीषा वाघमारेे (वय ४७, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) हिच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. बुधवारी सकाळी तिला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चाैकशीनंतर तिला दुपारी सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले. वाघमारे हिचे पती दंतवैद्यक तज्ज्ञ आहेत. ती गेल्या तीन वर्षांपासून लोखंडे याच्या संपर्कात होती. प्राथमिक चौकशीत ती विद्यार्थ्यांना लोखंडे याच्याकडे घेऊन जायची.

सीबीआयच्या पथकाकडून मोबाइल संभाषण, बँक खात्यातील व्यवहार तपासण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी कोण सामील आहेत का ?, यादृष्टीने तपास सुुरु आहे. वाघमारेच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे दिसून आले आहे. नीट परीक्षेच्या कालावाधीत तिच्या बँक खात्यात दहा लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. वाघमारे आणि लोखंडे हे एकमेकांकाच्या संपर्कात होते. समाज माध्यमातील संदेश वाघमारेने खोडले आहेत. त्यादृष्टीने पोलिसंकडून तपास करण्यात येत आहे. वाघमारेच्या मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

हडपसर मांजरी परिसरातून विद्यार्थी ताब्यात

हडपसर परिसरातील मांजरी भागातून शेषराव साेळंकी या अभियांत्रिकी शाखेतील विद्यर्थ्याला बुधवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले. तो एका नामांकित विद्यालयात सायबर सुरक्षा अभ्यासक्रम करत आहे. विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपविण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. लोखंडे याने नीट परीक्षेपूर्वी तीन ते चार दिवस आधी प्रश्नपत्रिका येणार असल्याची माहिती सोळंकी याला दिली होती.

नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात संशयावरुन मनीषा वाघमारे या महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशी करुन वाघमारेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे. शेषराव साेळंकी याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे.

– अमितेशकुमार, पोलीस आयुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×