Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

येरवड्यातील मनोरुग्णालयात तरुणाची आत्महत्या

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

मनोरुग्णाने गळफास घेऊन केली आत्महत्या

marathinews24.com

पुणे – येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्ण तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सनी मोहन सोनवणे (वय २९, रा. वसंतनगर, बारामती) असे आत्महत्या केलेल्या मनोरुग्ण तरुणाचे नाव आहे.

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कातील ५७ जणांची एटीएसकडून चौकशी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोरुग्णालयात एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मंगळवारी दुपारी पोलिसांना मिळाली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कदम आणि पथक तेथे पोहोचले. तेव्हा मनोरुग्णालयातील बकार क्रमांक एकमधील खोलीत सोनवणे याने खिडकीला पॅण्ट बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्चेदनसाठी दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

वेतन न मिळाल्याने सुरक्षारक्षकाची आत्महत्या; वडगाव बुद्रुकमधील शैक्षणिक संस्थेतील घटना

तब्बल १८ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने सुरक्षारक्षकाने एका शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करण्यापूर्वी सुरक्षारक्षकाने मोबाइलवर चित्रफीत तयार करुन ती प्रसारित केली. समीर माधव दाभोळकर (वय ५३) असे आत्महत्या केलेल्या सुरक्षाक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभोळकर हे वडगाव बुद्रुक येथील शैक्षणिक संस्थेत सुरक्षारक्षक होते. १८ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने ते तणावात होते. आर्थिक विवंचनेतून त्यांनी बुधवारी दुपारी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाइलवर चित्रफीत तयार केली. या चित्रफितीत आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दाभोळकर यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणात संबंधितांचा जबाब नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×