Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कातील ५७ जणांची एटीएसकडून चौकशी

पुण्यातील शिरूर, वारजे आणि चाकण परिसरातही छापे

marathinews24.com

पुणे – पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली. त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर, चाकण आणि पुणे शहरातील वारजे परिसरात छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी काही लोकांना एटीएसने ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्याची माहिती आहे.

खूनाचा कट रचणारे टोळके गजाआड – सविस्तर बातमी

एटीएसने बुधवारी (दि. १३) सकाळी आठ वाजल्यापासून ही मोहीम हाती घेतली. प्राथमिक माहितीनुसार, राज्यभरातील एकूण ५७ व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात असून त्यांचा ठावठिकाणा शोधून चौकशी केली जात आहे. मुंबई, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव येथे या धाडी टाकण्यात आल्या आहेत. शहजाद भट्टी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना देशविघातक कारवायांसाठी प्रवृत्त करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार एटीएसने ही कारवाई सुरू केली. संबंधित व्यक्तींच्या संपर्कांचे आणि सोशल मीडिया व्यवहारांची पडताळणी एटीएस कडून करण्यात येत आहे. डोंगर गँगच्या लोकांना फॉलो करणाऱ्यावर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती एटीएसकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×