Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

खूनाचा कट रचणारे टोळके गजाआड

तलवारीसह इतर साहित्य जप्त

marathinews24.com

पुणे – दाखल केलेल्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी खूनाचा कट रचणार्‍या तिघांना गुन्हे शाखेच्या युनीट सातने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन तलवारी, बेसबॉल स्टीक, दांडके असे मिळून २ लाख २२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. प्रकाश उर्फ दीपक शंकर चव्हाण (वय २४ रा. माळआळी, लोहगाव) अनिकेत रामचंद्र चव्हाण (वय २५, रा. वीर पुरंदर) आकाश दीपक धनवटे उर्फ भावडी (वय २० रा. आर्दशनगर, लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खून – सविस्तर बातमी

गुन्हे शाखा युनीट सातचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक ७ मे रोजी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार नीलेश साळवे, प्रशांत कापुरे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रकाश चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीतून धारदार हत्यार जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपीला हत्यारे आणि मोटार देणारा अनिकेत चव्हाण याच्यासह आणखी एकाने पुरवली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे मांडकी पुरंदरमधील राहणार्‍या दोघांसोबत वादविवाद होते.

आरोपी प्रकाश चव्हाण याच्याविरूद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी तिघांनी मिळून हत्येचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानुसार पथकाने आरोपींना अटक करीत घरझडतीतून तलवारीसह इतर साहित्य जप्त केले. ही कामगिरी अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी राजेंद्र मुळिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, एपीआय मदन कांबळे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, नीलेश साळवे, प्रशांत कापुरे, विनायक साळवे, निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, नितीन धाडगे, किरण पलांडे, प्रतीक्षा पानसरे, किर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×