Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

आर्थिक व्यवहाराच्या त्रासामुळे व्यावसायिकाने केली आत्महत्या

आर्थिक व्यवहाराच्या त्रासामुळे व्यावसायिकाने केली आत्महत्या

सहा जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – आर्थिक व्यवहारातून दिलेल्या त्रासामुळे व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मयूर महेंद्रकुमार भलानी (वय ४६, रा. सिद्धी गार्डन, ससाणेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत भलानी यांच्या पत्नीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता.

डेक्कन पोलीस ठाण्यातील दोघे कर्मचारी निलंबित – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भलानी व्यावसायिक आहेत. व्यवसायासाठी त्यांनी काही जणांकडून पैसे घेतले होते. आर्थिक व्यवहार, तसेच पैसे परत करण्यास उशीर झाल्याने त्यांना त्रास दिला. त्राासामुळे भलानी यांनी राहत्या घरात ३ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीला दिलेल्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×