फ्लॅटमधून साडेआठ लाख रुपयांचे दागिने चोरणारा रखवालदार अटकेत

सिंहगड रस्ता भागातील घरफोडीचा छडा

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून साडेआठ लाख रुपयांचा ऐवज चोरी प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. सोसायटीतील रखवालदाराने ऐवज लांबविल्याचे तपासात उघडकीस आले असून, या प्रकरणी रखवालदाराला अटक करण्यात आली. ही घटना सिंहगड रस्त्यावरील सोसायटीत घडली होती.राकेशकुमार मूलचंद सोनी (वय २९, रा. राम अमिलिया, जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या रखवालदाराचे नाव आहे.

कोंडव्यात दुकानदाराकडून खंडणी मागून तोडफोड – सविस्तर बातमी

सोनी हा सिंहगड रस्त्यावरील गणेश मळा परिसरात रखवालदार म्हणून काम करतो. ८ ऑगस्ट रोजी तक्रारदार हे बाहेरगावी गेले होते. सोसायटीतील रखवालदार सोनी याने तक्रारदाराच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आठ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले हाेते. १२ ऑगस्ट रोजी ते गावाहून परतले. तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तक्रारदाराने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चोरट्याने शयनगृहातील कपाटातून १० तोळे सोन्याचे दागिने लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. सोसायटीत घरकाम करणारे, रहिवाशी, तसेच रखवालदाराची चौकशी करण्यात आली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, रखवालदार सोनीला संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने ऐवज चोरल्याची कबुली दिली. सोनी याच्याकडून ८ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, अमोल दबडे, महेश मंडलिक, अमित चिव्हे, सूर्या जाधव, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, नानासाहेब खाडे, राकेश सुर्वे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×