Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामातील अडथळे दूर करणार -विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामातील अडथळे दूर करणार -विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

marathinews24.com

मुंबई – चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमी पासून इंदू मिल येल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मार्गाच्या कामातील अडथळे दूर करण्यात येतील, असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले.

खरीप हंगामात युरियासोबतच अन्य खताचा वापर करा – सविस्तर बातमी 

विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रमकुमार, कोकण महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, प्रदीप कांबळे, शशी प्रभू, बुद्ध धर्मगुरू ,बुधिष्ट सेवा सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, एम एम आर डी ए व विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भव्य वास्तू उभे राहत आहे. पुढील वर्षीपर्यंत हे काम पूर्ण होईल. चैत्यभूमी येथे येणारे अनुयायी या स्मारकास देखील भेट देतील. या अनुषंगाने सदर मार्ग होणे गरजेचे आहे. चैत्यभूमीचे ठिकाण समुद्रकिनारी असल्याने पर्यावरण विषयक मान्यता, तसेच हा रुंद मार्ग बनविण्यासाठी आवश्यक जागा या दृष्टीने संबंधित शासकीय विभागांकडून नियोजन करण्यात येईल, यासाठी माहिती घेण्यात यावी.

उपाध्यक्ष  बनसोडे म्हणाले, या दृष्टीने पर्यावरण विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचेकडून माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. यावेळी बुद्ध धर्मगुरू, बुद्धीष्ट सेवा सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी यांनी चैत्यभूमी व तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील सुविधांबाबत मागण्यांची बैठकीत माहिती दिली. अनेक वर्षांपासून चैत्यभूमीच्या विकासासाठी काम केले जात असल्याचे सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×