Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Chakan Sanitation Training : चाकण नगर परिषदेत स्वच्छता कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी कार्यशाळा

Chakan Sanitation Training : चाकण नगर परिषदेत स्वच्छता कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी कार्यशाळा

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत प्रशिक्षण; कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

marathinews24.com

पुणे – Chakan Sanitation Training : चाकण नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ, सुरक्षित कार्यपद्धती आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

‘सेवा संकल्प’मधून आश्रमशाळांमध्ये ज्ञान, आरोग्य अन् पर्यावरणाचा जागर – सविस्तर बातमी 

कार्यशाळेत स्वच्छता कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजातील शिस्त, स्वच्छता व्यवस्थापन, कचरा संकलन व वर्गीकरण, सार्वजनिक आरोग्य, कार्यस्थळी सुरक्षितता तसेच नागरिकांशी संवाद याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक पद्धतींचा अवलंब करून शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक बाबींवरही प्रशिक्षण देण्यात आले.

Chakan Sanitation Training यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रशिक्षणातील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. आपल्या दैनंदिन कामकाजात प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी योगदान देण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. Chakan Sanitation Training ‘स्वच्छ आणि सक्षम चाकण’ घडविण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या कौशल्यवृद्धीला प्रोत्साहन देणारे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प चाकण नगर परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×