Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

स्वस्तात सोने पडले महागात; २५ लाखांची फसवणूक

विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

पोलिसांनी दोघांविरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – स्वस्त सोने विकत घेणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. २५ लाख रुपयांत अर्धा किलो सोने देण्याच्या आमिषाने महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ५८ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवन मकसूद ठाकूर (वय ३९, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, मालाड, मुंबई), राजू गिट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंगारा देणारा हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी ठाकूर यांची ओळख झाली होती. तक्रारदार महिला एनडीए रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहे. आरोपींनी महिलेला २५ लाख रुपयांमध्ये अर्धा किलो सोने देण्याचे आमिष दाखविले होते. आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी २५ लाख रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी महिलेला सोने दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक धनवडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×