Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

कोयना धरण “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नावाने ओळखले जाणार

कोयना धरण "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार

जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील; निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

marathinews24.com

मुंबई – पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामांतर “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर” असे करण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहसिक निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेचे भविष्यामध्ये सायबर क्षेत्रापुढे आव्हान सायबर क्षेत्रातील तज्ञांचे मत – सविस्तर बातमी 

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलशयाचे नामांतर करण्याबाबत विनंती केली होती. शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून कोयना जलसागरास छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे ओळखले जाईल .

जलसागराचे नामांतर करण्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानंतर शासन निर्णय जारी झाल्याने येथून पुढे शासनाचा पत्रव्यवहार आणि अभिलेखा मध्ये तसा उल्लेख करण्यात येईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×