Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ९ च्या मेसमध्ये विद्यार्थ्यांच्या ताटात झुरळ

विद्यापीठ व वसतिगृह प्रशासनाकडून दुर्लक्ष

marathinews24.com

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील वस्तीग्रह क्रमांक ९ च्या मेसमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या ताटात झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ निमित्त पुणे–पिंपरी शहरात जल्लोषाची तयारी – सविस्तर बातमी

यापूर्वीही अन्नपदार्थांमध्ये झुरळे, आळ्या व किडे आढळल्याच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या मात्र विद्यापीठ व वसतिगृह प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थी अजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील मेसच्या समस्या सातत्याने वाढत असून अन्नाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अन्नपदार्थांमध्ये झुरळे, आळ्या व किडे आढळत असल्याच्या तक्रारी वारंवार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, १८ जानेवारी रोजी दुपारी वस्तीगृह क्रमांक ९ (G9) येथे जेवणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या ताटात झुरळ आढळून आले.

हा प्रकार मेस चालवणाऱ्या व्यक्तीच्या निदर्शनास आणून दिला असता, ते झुरळ नसून मुंगळा आहे. असे बेजबाबदार वक्तव्य करण्यात आले, असा आरोप विद्यार्थी अँड. ऋषिकेश जगताप यांनी केला आहे. मुलांच्या जेवणात मुंगळा असणे परवानगीचे आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून तत्काळ मेसची तपासणी, स्वच्छतेचे कठोर निकष, नियमित अन्ननमुना चाचणी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. विद्यापीठ प्रशासनाने याप्रकरणी तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हमी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×