Breking News
Pune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठराव

 महापालिकेच्या मासुळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया कक्षाची उभारणी

 महापालिकेच्या मासुळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया कक्षाची उभारणी

अत्याधुनिक उपकरणांमुळे दरवर्षी सुमारे ४ हजार ५०० रुग्णांवर उपचार करणे होणार शक्य

marathinews24.com

पिंपरी – पिंपरी चिंचवड पिंपरीमधील मासुळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालयाने नेत्र उपचार सेवांमध्ये भरीव सुधारणा करत नवीन नेत्र शस्त्रक्रिया कक्षाची उभारणी केली आहे. या कक्षाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यामुळे आता दररोज ३० ते ३५ शस्त्रक्रिया करणे शक्य होणार असून, यापूर्वीची २० ते २५ शस्त्रक्रियांची सरासरी क्षमता लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे. परिणामी, रुग्णांच्या प्रतीक्षेचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वेळेवर उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या कंपाउंडरला अटक – सविस्तर बातमी 

या नवीन शस्त्रक्रिया कक्षात उच्च दर्जाचे मायक्रोस्कोप आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री बसविण्यात आली असून हे साहित्य कॉटकॅम इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. या संस्थेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन कॉटकॅम इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अर्जुन सिरूर यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी आणि सीएसआर प्रमुख निळकंठ पोमन, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सीएसआर सेलचे विजय वावरे व डॉ. महेश गौरी आणि त्यांची टीम यांनी केले.

मासुळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालय हे महापालिकेच्या वतीने चालवले जाणारे एक स्वतंत्र नेत्र उपचार केंद्र असून, परिसरातील रहिवासी, ग्रामीण भागातील नागरिक आणि एमआयडीसी परिसरातील कामगारवर्गासाठी ही सेवा विशेषतः महत्त्वाची आहे. याआधी मर्यादित साधनसंपत्तीमुळे रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी एक ते दीड महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत होती. आता नव्या उपकरणांमुळे वर्षभरात सुमारे ४,५०० अधिक (सुमारे ५० टक्क्यांची वाढ) रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे.

या विस्तारामुळे रुग्णांवरील आर्थिक भार देखील कमी होणार असून, प्रतीक्षेमुळे होणारे नुकसान टळेल आणि वेळेवर नेत्र उपचार उपलब्ध होणार आहेत. यामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×