Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

बांधकाम व्यावसायिक पित्याकडून मुलाच्या हत्येचा कट

बांधकाम व्यावसायिक पित्याकडून मुलाच्या हत्येचा कट

गोळीबार प्रकरणात पिस्तूल पुरविणारा अटकेत

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून मुलाच्या हत्येसाठी ७५ लाख रुपयांची सुपारी प्रकरणात पिस्तूल पुरविणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. जंगली महाराज रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आल्यानंतर पिस्तूल पुरविणारा आरोपी पसार झाला होता. निलेश श्रीकांत गायकवाड (वय २४, रा. पिसोळी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

खिडकीत चावी ठेवणे महागात; ११ लाखांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी 

जंगली महाराज रस्ता परिसरात १६ एप्रिल २०२४ रोजी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर पिस्तुलातून गाेळीबार करण्यात आला होता. मात्र, पिस्तुलातून गोळी न उडाल्याने बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा वाचला. या घटनेनंतर दुचाकीवरुन हल्लेखोर पसार झाले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासात कौटुंबिक वादातून बांधकाम व्यावसायिक पित्याने मुलाची हत्या करण्यासाठी दोघांना ७५ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती मिळाली. पाेलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह हल्लेखोरांना अटक केली होती.

गोळीबार प्रकरणात पिस्तूल पुरविणारा आरोपी गायकवाड हा पसार झाला होता. खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी पिसोळी भागात गस्त घालत होते. त्यावेळी गायकवाड हा आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून गायकवाडला पकडले. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, साहील शेख यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×