Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

डिजिटल पुराव्यांचे पेन ड्राईव्ह सर्व आरोपींना कोर्टाचे आदेश

दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणाची पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार

दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणाची पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार

marathinews24.com

बीड (अनंत जाधव)- जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज दि.८ जानेवारी रोजी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत पुराव्यांची देवाण घेवाण, आरोपींचे अर्ज आणि तांत्रिक कागदपत्रांवरून जोरदार युक्तिवाद झाला. प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली असून, महत्त्वाचे डिजिटल पुरावे असलेले पेन ड्राईव्ह सर्व आरोपींना उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

बांधकाम क्षेत्रात संशोधन व इनोव्हेशनवर भर द्यायला हवा – सविस्तर बातमी 

पुराव्यांच्या पारदर्शकतेसाठी ही मागणी आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली होती. त्यावर कोर्टान आरोपींना पेन ड्राईव्ह देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर लॉपटॉपची क्लोन कॉपी आणि तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणे आरोपीच्या वकिलांने पुराव्याचा भाग म्हणून लॉपटॉपची ‘क्लोन कॉपी’ मिळावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. यावर तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलांने आपले मत मांडण्यासाठी वेळ मागितला असून, येत्या १५ कार्यालयीन दिवसांत यावर लेखी उत्तर सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.या प्रकरणातील काही आरोपींनी आपले वकील बदलण्याची मागणी केली आहे. यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपले लेखी म्हणणे सादर करावे, असे निर्देश दिले आहेत.या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी विष्णू चाटे याने आपले कारागृह बदलून मिळावे, यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. त्याच्या वकिलांमार्फतही यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी आता २३ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×