Breking News
पुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजन

जुन्या वादातून एकाला भोसकले, दोघांना अटक

जुन्या वादातून धारधार शस्त्रांनी केले वार, दोघांना अटक

marathinews24

पुणे – जुन्या वादातून दोघांनी मिळून एकाला भोसकून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी हल्लेखोरांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३१ मार्चला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वैदवाडीतील साम्राज्य प्रतिष्ठानजवळ घडली आहे. सलीम महमंद शेख (वय ३०)  आणि जाफर उर्फ अमिर महमंद शेख (वय ३२, दोघेही रा. वैदवाडी, हडपसर)  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सलीम सय्यद  असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी आवेज फिरोज शेख (वय २३ रा. वैदवाडी, हडपसर ) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम सय्यद आणि आरोपी वैदवाडी परिसरात राहायला असून, त्यांच्यात काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याचा राग सलीम शेख आणि जाफरला होता. त्याच रागातून आरोपींनी  ३१ मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास सलीम सय्यद यांना  वैदवाडीतील साम्राज्य प्रतिष्ठानजवळ गाठले. त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने पोटात वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश िंशदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×