टोळीला अटक, कात्रज बोगद्यात केली होती लुट
marathinews24.com
पुणे – Crime News : संकष्ट चतुर्थीनिमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला टोळक्याने लुटले. ही घटना २९ सप्टेंबरला पहाटे साडेचारच्या सुमारास कात्रज बोगद्यातील दुसर्या वळणावर घडली आहे. याप्रकरणी टोळक्याला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी
Crime News तौहिद असला शहा (वय २३ रा. नेहरुनगर, पिंपरी) सुलेमान यासिन शेख वय २१ रा. नेहरुनगर, पिंपरी) रोहित बबलुसिंग (वय २० रा. पिंपरी अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी खेड शिवापूर परिसरात राहणार्या ४६ वर्षीय नागरिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खेड शिवापूर परिसरात राहायला असून, २९ सप्टेंबरला पहाटे चारच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पत्नीसह दुचाकीवर जात होते. Crime News त्यावेळी कात्रज बोगद्यातील दुसर्या वळणावर चोरट्यांच्या टोळीने त्यांना अडवले. त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेत पत्नीच्या गळ्यातील १ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी तक्रारदाराने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पथकाने तात्काळ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तपास करीत आहेत.






















