आंबेगाव बुद्रुकमधील ६४ वर्षीय नागरिकाची फसवणूक
marathinews24.com
पुणे – Share Trading Fraud : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जेष्ठ नागरिकाची १५ लाखांची फसवणूक झाली आहे. ही घटना २८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर २०२५ कालावधीत आंबेगाव बुद्रुकमध्ये घडली आहे. याप्रकर अनोळखी मोबाइलधारक, ट्रेडिंग अॅप व लिंक वापरणारे तसेच विविध बँक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उमेश जनार्दन चव्हाण (वय ६४, रा. अॅस्टोनिया रॉयल, आंबेगाव बुद्रुक ) यांनी फिर्याद दिली आहे.
छळास कंटाळून तरुणीची आत्महत्या, आरोपीला अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चव्हाण हे आंबेगाव बुद्रुक मध्ये राहायला असून, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगून चव्हाण यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. Share Trading Fraud ट्रेडिंग अॅप व लिंकचा वापर करून त्यांच्याकडून १५ लाख रुपये वर्ग करुन घेतले. अपेक्षित परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे तपास करत आहेत.
विसर्जन मिरवणुकीत जेष्ठाची सोन्याची चेन लंपास
पुणे- गणेश विसर्जन मिरवणूक पाहत असताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाच्या गळ्यातील ६० हजारांची सोन्याची चैन चोरुन नेली. ही घटना २५ सप्टेंबरला सकाळी साडेअकरा ते सव्वा बाराच्या सुमारास दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ते बेलबाग चौक दरम्यान घडली. याप्रकरणी मुंढव्यात राहणार्या ६१ वर्षीय नागरिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, मुंढव्यात राहायला आहेत. २५ सप्टेंबरला ते गणेश विसर्जन मिरवणूक पाहायला बेलबाग चौकात गेले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी तक्रारदाराच्या गळ्यातील ६० हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली. काही वेळानंतर तक्रारदाराला गळ्यात चैन नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप माळी तपास करीत आहेत.





















