चतुःशृंगी पोलिसांनी केली अटक
marathinees24.com
पुणे – Pune Crime News : तरूणीसोबत विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करुन तिला शारिरीक व मानसिक त्रास देउन आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची घटना वडारवाडीत घडली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २६ सप्टेंबरला जय मित्रमंडळाजवळील इमारतीत घडली आहे. याप्रकरणी मुकेश नागेश विटकर (रा. वडारवाडी, गोखलेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ज्योती मुकेश विटकर (वय २६ असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
टँकरच्या धडकेत दुचाकीवरील महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश आणि ज्योती यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यानंतर काही महिन्यांनी मुकेशने ज्योतीला शारिरीक व मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. Pune Crime News छळास कंटाळून ज्योतीने २६ सप्टेंबरला राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुकेशला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.
फ्लॅट नावावर करण्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्या
पैशांसह फ्लॅट नावावर करण्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून महिलेनी आत्महत्या केली आहे. ही घटना २९ नोव्हेंबरला मुंढव्यातील केशवनगरात व्यंकटेश ग्राफिटी सोसायटीतील बी विंगमध्ये घडली आहे. त्रिष्णा बाळकृष्ण निकम वय ३३ असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राहूल संजय सकपाळ वय ३५) याच्यासह सासु-सासरे, नणंद व आजीविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा निमकर तपास करीत आहेत.
























