मित्र जखमी; पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघात
marathinews24.com
पुणे – भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातात Accident News दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. अनयकुमार उदयकुमार चौधरी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार अनय मंगेश कामदेव (वय २१, रा. तोरडोस हाईट्स, शेवाळवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) जखमी झाला. याबाबत अनय कामदेव याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात वर्ग मित्रांकडून शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार – सविस्तर बातमी
Accident News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अनय आमि त्याचा मित्र अनयकुमार हे २८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास महाविद्यालयातून घरी निघाले होते. लोणी काळभोर परिसरात भरधाव टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी अनयकुमार आणि अनय हे जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या अनयकुमार याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी शिक्षिकेचे दागिने चोरीला
पीएमपी प्रवासी शिक्षिकेचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. याबाबत शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. ।पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४१ वर्षीय शिक्षिका या सदाशिव पेठेतील टिळक रस्ता परिसरात राहायला आहेत. २८ सप्टेंबर रोजी त्या सकाळी पावणेदहाच्या सुमारास पुणे-मुंबई रस्त्यावरील वाकडेवाडी स्थानक परिसरातून पीएमपी बसने टिळक रस्त्याकडे निघाल्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी शिक्षिकेच्या पिशवीतून मंगळसूत्र, मोबाइल, रोकड असा ४८ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक शेंडे तपास करत आहेत.





















