दोन अल्पवयीन ताब्यात
marathinews24.com
पुणे – Pune Crime : शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना आंबेगाव बुद्रुक भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले अल्पवयीन वर्गमित्र असून हल्ल्यात १५ वर्षीय शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शाळकरी मुलाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बनावट भरती घोटाळ्यात जेजुरी देवस्थानचा विश्वस्त अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगा आणि ताब्यात घेण्यात आलेली मुले हे वर्गमित्र आहेत. त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. तक्रारदार मुलगा हा वडगाव बुद्रुकमधील घुलेनगर परिसरात राहायला आहे. मंगळवारी (२९ सप्टेंबर) दुपारी बाराच्या सुमारास तो शाळेत निघाला होता. आंबेगाव बुद्रुक भागातील दभाडी परिसरात मुलाला वर्गमित्रांनी गाठले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार Pune Crime करुन ते पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी पसार झालेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांना येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत. दरम्यान, शाळकरी मुलांमधील वादातून मारामारीच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. भवानी पेठेतील शाळेसमोर मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती.





















