Breking News
डीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषण

केतनचा डमी पुतळा दरीत फेकून क्राईम रिक्रिएशन

केतनचा डमी पुतळा दरीत फेकून क्राईम रिक्रिएशन

सिया गोयला पोलिसांनी नेले लोहगडावर

marathinews24.com

पुणे – व्यावसायिक केतन अगरवाल खून प्रकरणाच्या तपासाला रविवारी (दि.२८) निर्णायक वळण मिळाले. पहाटे पाचच्या सुमारास आरोपी सिया गोयलला कडेकोट बंदोबस्तात लोहगडावर नेऊन ‘क्राईम रिक्रिएशन’ करण्यात आले. केतन अगरवालचा डमी पुतळा तयार करून ज्या ठिकाणावरून त्‍याला दरीत ढकलल्याचा आरोप आहे, त्याच ठिकाणावरून पुतळा खाली फेकत संपूर्ण घटनाक्रमाची प्रत्यक्ष पडताळणी पोलिसांनी केली. त्यामुळे तपासातील अनेक दुवे अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे. तपास अधिक मजबूत करण्यासाठी सियाकडून घटनास्थळी प्रत्येक हालचाल करून घेण्यात आली. तिने केतनला नेमके कुठे उभे केले, स्वतः कुठे थांबली आणि कथितपणे चेतन चौधरीला कसा संकेत दिला, याची माहिती पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी तपासून घेतली.

खराडीत मुलीसोबत वाद, टोळक्याकडून वाहनांची तोडफोड – सविस्तर बातमी 

क्राईम रिक्रिएशनदरम्यान लोहगडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पर्यटकांसाठी काही काळ किल्ला पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या कारवाईसाठी सियाला घटनास्थळी आणण्यात आले; मात्र सहआरोपी चेतन चौधरीला पोलिसांनी रविवारी लोहगडावर आणले नव्हते. केतन अगरवाल याला संपविण्याचा कट कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथील कॅफेमध्ये अनेक बैठका घेऊन रचण्यात आला होता. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला मार्गातून दूर करण्यासाठी नियोजनबद्ध कट आखला होता. केतनला कुठे न्यायचे, कोणत्या ठिकाणी त्याचा घात करायचा, अपघाताचा आभास कसा निर्माण करायचा आणि संशय कसा टाळायचा, याचे नियोजन आरोपींनी आधीच केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार, १८ जून रोजी सियाने केतनला लोहगडावर नेले, तर चेतन आधीपासूनच किल्ल्यावर उपस्थित होता.

ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सियाने खाली बसून चेतनला संकेत दिला आणि त्यानंतर त्याने मागून येत केतनला दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यानंतर तोल जाऊन पडल्याची कथा सांगत अपघाताचा बनाव रचल्‍याचे तपासात निष्पन्न झाले आहे. केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी सुरुवातीपासून व्यक्त केलेल्या संशयामुळे तपासाला नवी दिशा मिळाली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, डिजिटल पुरावे आणि आरोपींच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण कटाचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. रविवारी झालेल्या क्राईम रिक्रिएशनमुळे आरोपींच्या जबाबातील तपशील आणि घटनास्थळी घडलेला कथित घटनाक्रम यांची पडताळणी करण्यास तपास यंत्रणेला महत्त्वाची मदत मिळाल्याचे सांगितले जात आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदिपसिंह गिल्‍ल यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही क्राईम रिक्रिएशनची प्रक्रीया पार पडली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×