खराडीतील थिटे वस्तीवरील माताजी मार्केटजवळ घडली घटना
marathinews24.com
पुणे – मुलीसोबत झालेल्या वादाचा राग आल्यामुळे आरोपीने साथीदारांना बोलावून घेत लोखंडी हत्यारासह दांडक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना २६ जूनला रात्री साडेआठच्या सुमारास खराडीतील थिटे वस्तीवरील माताजी मार्केटजवळ घडली आहे. याप्रकरणी चौघांना खराडी पोलिसांनी अटक केली असून, एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.
वेल्ह्यातील पाबे घाटात बस दरीत कोसळली – सविस्तर बातमी
रोहित उर्फ रमेश संजय गवळी (वय २३ रा. केशवनगर, मुंढवा) समर्थ बसवराज केंगारे (वय १८ रा. केशवनगर, मुंढवा) किरण संजय गवळी (वय २१, केशवनगर, मुंढवा) विनोद श्रावण गवळी ( वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खराडीतील एकाने फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलीसोबत एका आरोपीचा वाद झाला होता. त्याच रागातून त्याने २६ जूनला रात्री साडेआठच्या सुमारास आरोपींना एकत्र बोलावले. हातातील शस्त्र आणि दांडक्यांनी त्यांनी परिसरातीली वाहनांची तोडफोड केली. परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच, खराडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजनुसार पसार आरोपींचा शोध घेउन चौघांना अटक केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सावन आवारे तपास करीत आहेत.






















