Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Dagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र

Dagdusheth Ganpati Trust : 'दगडूशेठ' गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजन

marathinews24.com

पुणे – Dagdusheth Ganpati Trust : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानातंर्गत महाराष्ट्राच्या विविध भागातील ५०० ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

गर्भलिंगनिदानाच्या रॅकेटविरोधात ‘मोका’अंतर्गत कारवाईसाठी पाठपुरावा-डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष सुनील रासने, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, विश्वस्त राजेंद्र गावडे, विश्वस्त पराग वांबुरे, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, राजेंद्र पायमोडे, सुवर्णयुग तरुण मंडळ अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, सनी सिद्ध, ऋणाल केसरकर ,विशाल केदारी, तुषार रायकर, दिनेश परदेशी, महादेव पवार, इंद्रजीत रायकर, संतोष रसाळ यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Dagdusheth Ganpati Trust अ‍ॅलिम्को कंपनीच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे वैद्यकीय सेवा प्रमुख राजेंद्र परदेशी आणि सहकाऱ्यांनी उपक्रमाचे व्यवस्थापन केले.

ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद अंगीकारून ट्रस्ट कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील गरजू रुग्णांसाठी विविध सेवा दिल्या जात आहे. त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्र वाटप हा उपक्रम राबविला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांची पूर्व नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या कानाचे माप घेऊन त्यानुसार यंत्र दिले जाते. त्यामुळे भविष्यात रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यासारख्या भागातून तसेच बीड, जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ अशा विविध जिल्ह्य़ातील लाभार्थीचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत ३२ हजार नागरिकांना मोफत श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×