Breking News
Traffic Rules Pune : वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा- रवींद्र आहेररावPurandar Airport Project : पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळलीबळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर

दिग्विजयची पोलिसांकडून चौकशी, पार्थवर गुन्हा दाखल होण्याची टांगती तलवार

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढवा परिसरात असलेल्या सरकारी जमीन घोटाळा प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील याची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १ डिसेंबरला चौकशी करून जबाब नोंदवला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जमीन घोटाळा प्रकरणी आम्ही टप्प्याटप्प्याने कारवाई करत आहोत, यामध्ये कोणालाही सोडणार नसल्याचा इशारा अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिला आहे. दरम्यान, यातील आरोपी शीतल तेजवाणीला पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी – सविस्तर बातमी

पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीने मुंढव्यातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केली होती. त्यासाठी शीतल तेजवाणी हिने २७२ लोकांकडून पॉवर ऑफ अटर्नि घेतली. त्यानंतर भागीदारीत असलेल्या अमेडिया कंपनीला विक्री केली होती. जमीन घोटाळा प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर बोपोडीतील जमीन घोटाळ्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दाखल आहे. हा गुन्हा खडक पोलीस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला होता. आर्थिंक गुन्हे शाखेने शीतल तेजवाणीचा जबाब नोंदवला होता. जमीन घोटाळ्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याानंतर तिला अटक झाली. दरम्यान, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिग्विजय पाटील याला नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १ डिसेंबरला दिग्विजय पाटील आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाला. त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला.

चौकशीदरम्यान काय म्हणाला दिग्विजय

संबंधित प्रकरणी चौकशीसाठी पुन्हा बोलावल्यास मी हजर राहीन. मात्र सध्या मला परदेशात जय पवारा याच्या लग्नाला जायचे असल्याने, लग्नावरून परत आल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी येईन, असेही दिग्विजय पाटील यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे चौकशीदरम्यान अनेक मुद्द्यांची तपासणी झाल्याने, आता पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पार्थ पवारांवरही गुन्ह्याची टांगती तलवार

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा जय पवाराचा परदेशात बहारिन इथे लग्न सोहळा ५ डिसेंबरला पार पडणार आहे. मात्र दुसरीकडे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात बंधू पार्थ पवारावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. जयच्या लग्नाला दिग्विजय पाटीलही उपस्थित राहणार आहे. दरम्यान, दिग्विजय पाटील, पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अमेडिया कंपनीची ९९ टक्के भागिदारी असलेले पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×