Breking News
Satyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

‘दिलखुलास’मध्ये पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध

‘दिलखुलास’मध्ये पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध

यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांची विशेष मुलाखत

marathinews24.com

मुंबई – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात “पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध” या विषयावर यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांच्या अनुभवावर आधारित विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित – सविस्तर बातमी 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक असलेली पंढरपूर आषाढी वारी ही सातशे वर्षांची अखंड परंपरा आहे. दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या भव्य सोहळ्याचे सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुरळीत व्यवस्थापन करण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून व्यापक प्रशासकीय नियोजन केले जाते. या नियोजनामागील कार्यपद्धती, अनुभव आणि प्रभावी व्यवस्थापनाची सविस्तर माहिती या मुलाखतीतून जाणून घेता येणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, १८ जुलै, सोमवार, २० जुलै, मंगळवार, २१ जुलै आणि बुधवार, २२ जुलै रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन सुषमा जाधव यांनी केले आहे.

या मुलाखतीत डॉ. सुहास दिवसे यांनी पालखी मार्गाचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रण कक्षाची कार्यपद्धती तसेच महसूल, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर संबंधित विभागांतील समन्वयाची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच मोठ्या लोकसमूहाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले पूर्वनियोजन, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

वारीच्या काळात प्रशासन, स्थानिक यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि वारकरी यांच्यातील समन्वयातून श्रद्धा आणि सुयोग्य व्यवस्थापनाचा प्रभावी संगम कसा साधला जातो, तसेच सार्वजनिक प्रशासनातील उत्तम नियोजनाचे हे प्रेरणादायी उदाहरण कसे ठरते, याचा उलगडा या विशेष मुलाखतीत करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×