Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित

मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

marathinews24.com

पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम दि. २० जून २०२६ पासून सुरू असून हा कार्यक्रम प्रभावी व सुरळीतपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित केले आहेत.

क्रीडा क्षेत्राला उभारी देण्यासाठी कटिबद्ध असल्याची उपमहापौरांची ग्वाही – सविस्तर बातमी 

मतदारांना पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत आवश्यक माहिती, मार्गदर्शन तसेच अडचणींचे निराकरण करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनी अथवा ई-मेलद्वारे संपर्क साधता येणार आहे.

ग्रामीण भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर,भोर व मावळ या विधानसभा मतदारसंघांसाठी श्रीमती सुरेखा माने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ११), जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक १९५० तसेच sirhelpdeskrural@gmail.com हा ई-मेल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

चिंचवड, पिंपरी व भोसरी या विधानसभा मतदारसंघांसाठी श्री. सचिन पवार, उपआयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याशी ८८८८००६६६६ या क्रमांकावर किंवा sirhelpdeskpcmc@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

तर वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटोन्मेंट आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांसाठी श्रीमती प्राची कचरे, महापालिका सहाय्यक आयुक्त, पुणे महानगरपालिका या समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्याशी ०२०-२५५०६६४९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा sirhelpdeskpmc@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

मतदारांनी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्या, माहिती अद्ययावत करणे अथवा इतर बाबींकरिता संबंधित मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×