Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडा – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

marathinews24.com

पुणे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ करिता केलेल्या तयारीचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा घेतला.

भाविकांसाठी उत्कृष्ठ दर्जाच्या सेवा – सुविधा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, नगर विकास शाखेच्या प्रभारी जिल्हा सह आयुक्त अँलिस पोरे, नगरपालिका व नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, आदी उपस्थित होते.

डुडी म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायती यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जारी केलेला आहे. सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी.

आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करून सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी प्रभाविपणे पार पडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले

निवडणूका शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्याकरिता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करावे. केलेले नियोजन व कार्यवाहीबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. संबंधित विषयांच्या नोडल अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबतचा विस्तृत आढावा उद्या दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल, असेही डुडी म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×