Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

श्री शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक वळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर वाहतूक वळविण्याचे आदेश जारी

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आदेश जारी

marathinews24.com

पुणे – प. पु. पंडीतजी श्री प्रदिप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेचे मौजे रामलिंग रोड, शिरुर येथे आयोजन करण्यात आले असून २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वा. पर्यंत शिरुर ते पाबळ रोडवरील (राज्य महामार्ग क्र.५४) वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.

‘हिंद-दि चादर’ कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी वाहतूक व्यवस्थापन – सविस्तर बातमी

या आदेशानुसार हा कार्यक्रम मौजे रामलिंग, ता. शिरुर येथे होत असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या भक्तगणाच्या सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने वाहतूक वळविण्यात येणार आहे.
भक्तगणानी आपली वाहने वाहनतळ ठिकाणीपार्क करुन कार्यक्रम स्थळी पायी जात येणार आहे.

पाबळ रोड, शिरुररोडवरुन रामलिंगकडे जाणारी वाहतूक अग्निशामक केंद्र चौक, शिरुर येथून नवीन नगरपालिका रोड-जुना अहिल्यानगर पुणे हायवे रोड-बरला आर्टस शेजारील बगाड रोड ते बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग या मार्गे रामलिंगकडे जातील.

मौजे रामलिंगकडून शिरुरकडे जाणारी वाहतूक बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग बगाड रोड ते बरला आर्टस शेजारुन जुना पुणे अहिल्यानगर हायवे रोडला मिळून शिरुरमध्ये जाईल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×