Breking News
Kharadi Bypass Robbery Case : पादचारी जेष्ठेच्या अंगावर पाणी उडवून लुटलेLost Mobile Recovery : वाघोली पोलिसांनी तक्रादारांच्या चेहर्‍यावर फुलवले हसूPune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटनाBopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळलीSugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमDeposit Fraud : छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी प्रकरण; ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन

Divya Shinde : बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली

Divya Shinde : बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली

डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ आरोपी निष्पन्न

marathinews24.com

पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला आणि पाच लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी ‘बिग बॉस’फेम Divya Shinde हिच्या पोलिस कोठडीत २ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमित कुलकर्णी यांनी दिला आहे. तपासात तब्बल १७ जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून, हल्ल्यासाठी आठ दुचाकींचा वापर झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

दगडूशेठच्या दर्शनासाठी चाललेल्या दाम्पत्याला लुटले – सविस्तर बातमी 

हल्ल्यातील हत्यारे, मोबाइल फोन आणि अन्य डिजिटल पुरावे जप्त करणे बाकी असल्याने कोठडी वाढविण्याची मागणी पोलिसांनी केली होती. बुधवारी (दि. ३०) Divya Shinde न्यायालयात हजर करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि डॉ. गायकवाड यांच्या हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींची माहिती समोर आली आहे. आठ दुचाकींवरून हे आरोपी घटनास्थळी आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपास पथकाने ‘ब्लू नाईल’ हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

त्यामध्ये आप्पा ढमढेरे, डॉ. गायकवाड आणि त्यांच्या मुलामध्ये पाच लाख रुपयांच्या खंडणीबाबत बैठक झाल्याचे दिसून येत असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. तपासात आप्पा ढमढेरे (रा. पिंपरी), निखील शिंदे, निखीलची होणारी पत्नी, ताहीर (रा. कोंढवा) यांच्यासह अन्य १३ अनोळखी व्यक्तींचा सहभाग निष्पन्न झाल्याचे सरकारी वकील आम्रपाली कस्‍तुरे यांनी न्यायालयात स्पष्ठ केले.

हत्यारे, मोबाइल जप्त करणे बाकी

हल्ल्यात वापरलेले लोखंडी हत्यार, लाकडी दांडके, स्वाक्षऱ्यांचे नमुने, हस्तलिखित मजकूर आणि हल्ल्याचे चित्रीकरण करणारा मोबाइल फोन अद्याप जप्त झालेला नाही. या वस्तूंच्या जप्तीसह गुन्ह्याच्या कटाचा उलगडा करण्यासाठी दिव्या शिंदेची कोठडी वाढवणे आवश्यक असल्याची मागणी सरकारी वकील कस्तुरे यांनी केली.

अँक्झायटी अटॅक’ लपवत असल्‍याचा पोलिसांची न्यायालयात माहिती

रिमांड रिपोर्टनुसार, चौकशीदरम्यान Divya Shinde तपासात सहकार्य करीत नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. माहिती देण्यास टाळाटाळ करणे, अंगविक्षेप व आरडाओरड करणे तसेच ‘अँक्झायटी अटॅक’ (‘तीव्र चिंतावस्था’) आल्याचे सांगून माहिती लपविल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्‍या अहवालात नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×