Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

डाॅक्टरांचे अपहरण करुन उकळली १९ लाखांची खंडणी

 ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ३३ लाखांची फसवणूक

पाच जणांविरुद्ध खंडणी, अपहरण, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोटारीतून निघालेल्या डाॅक्टांसह तिघांचे अपहरण करुन १९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पुणे-सोलापूर महामार्गावरील ऊरळी कांचन परिसरात ही घटना घडली. पसार झालेल्या आरोपींचा ग्रामीण पोलिसांच्या पथकांकडून शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध खंडणी, अपहरण, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डाॅक्टरांनी ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५८ वर्षीय डाॅक्टरांचा ऊरळी कांचन परिसरात दवाखाना असून ते कुंजीरवाडी परिसरात राहायला आहेत. १० जानेवारी रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास डाॅक्टर , त्यांचा चालक आणि मदतनीस महिला मोटारीतून जात होते. त्यावेळी ऊरळी कांचनमधील प्रयागधाम रस्त्यावर मोटारीतून पाच जणांनी डाॅक्टरांची मोटार अडविली. त्यांना शस्त्राचा धाक दाखविला. आरोपींनी डाॅक्टरांना मारहाण केली. आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाचा चावा घेतला. मोटार चालक, डाॅक्टर, तसेच मदतनीस महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. डाॅक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयाला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी तिघांना डांबून ठेवले. त्यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली.

डाॅक्टरांकडून १९ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. खंडणी उकळण्यात आल्यानंतर डाॅक्टरांसह तिघांची सुटका करुन आरोपी पसार झाले . डाॅक्टरांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×