दुर्गम प्रतिष्ठानचा उपक्रम ठरला आधार
marathinews24.com
पुणे – स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्याच्या आसऱ्याला, भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात डोंगरावर वसलेल्या देहण, जळकेवाडी, झानेरी, मुऱ्हा गावांना पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठानच्या (Durgam Pratishthan Diwali Initiative) वतीने दिवाळी भेट सुपूर्द करण्यात आली. तीव्र दुष्काळाच्या सावटामध्ये माणुसकीचा दिवा म्हणून राबविण्यात आलेल्या हा उपक्रम आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचितांसाठी आधार ठरला आहे.
‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून खेळ गावागावांत पोहोचला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी
अति दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, शहरवासीयांप्रमाणे त्यांनाही हा दिपोत्सव उत्साहाने साजरा करता यावा, या उद्देशाने पुण्यातील ‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने रविवारी (ता. १ ) संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जाधव, कार्याध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे यांच्या नेतृत्त्वाखाली हा उपक्रम साजरा करण्यात आला.
गावातील ७५ कुटुंबांना साखर, तेल, पोहे, रवा, बेसनपीठ, गव्हाचे पीठ, तूप, कडधान्य, डाळी, साबण, चहा पावडर, मसाले आदी महिनाभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ, ब्लॅंकेट, कानटोपी, आकाश कंदील, बिस्किटे, सुगंधी तेल, साबण, पणती, उटणे, रांगोळी आदी जीवनावश्यक १०० वस्तूंसह चारशे वह्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात केले. यावेळी देण्यात आलेल्या सौर कंदिलामुळे या वाड्यांचा अंधार दुरू होण्यास मदत होणार आहे. गावातील १३६ महिलांना साड्या, १०९ मुलामुलींना, तसेच २०० ज्येष्ठ नागरिकांना नवीन कपडेही देण्यात आले.
रविवारी (दि. १) सकाळी ७ वाजता दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सुर्यंवंशी व बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या शुभहस्ते दिवाळी साहित्याचे पूजन करून गाड्या रवाना झाल्या. गावात पोचताच गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणुक काढून सर्वांचे स्वागत केले. पुणेकरांच्या स्वागतासाठी पानाफुलांच्या मदतीने स्वागत कमान उभारली. गावात पोचताच सर्वांचे औक्षण करण्यात आले. (Durgam Pratishthan Diwali Initiative) छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष सुनील रासने यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर गावतील आजी-आजोबा, जेष्ठ नागरिकांचे औक्षण करण्यात आले.
‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेचे स्वाती सेठ, श्रीकांत मोरे, रविंद्र पठारे, अॅड. प्रमोद पवार, सुनंदा मोरे, स्वाती वाडेकर, निलेश जांभळे, गणेश काळे, अमोल कुटे, संजय ऐलवाड, सुनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रमासाठी रवि जाधव, श्रीप्रसाद गिरी, राजूशेठ गिरे, नितीन शहा, राहूल जाधव, संतोष कस्पटे, अॅड. शिवराज कदम, मनोज दंतकाळे,अशोक जाधव, सुरेश मांदळे, विनायक अवसरे, वाल्मिक ढोरकुले, अमोल मुंडे, अनिल शिंदे, संजय जाधव,सिद्धेश जाधव, मनोहर कोंडाळकर, त्याच बरोबर महिला प्रतिनिधी रश्मी जाधव, करूणा कदम, रुपाली पटवर्धन, नीलम खंडागळे, लता कोंढाळकर, कल्याणी कदम, श्रृती जाधव, समृद्घी सेठ, अश्विनी शेळके, खुशी गवळे, साक्षी शेळके त्यांच्यासह आधार ग्रुप, मेडिवन मेडिकल्स, दशानेमा भगवती मंडळ या संस्थांनी विशेष सहकार्य केले.






















