Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

ए मोहब्बत तेरे अंजामपे रोना आया..

‘याद-ए-बेगम अख्तर’ : सूर, नाद आणि शब्दांचे गुंजन

marathinews24.com

पुणे – मल्लिका ए गझल म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेगम अख्तर यांनी गाऊन अजरामर केलेल्या अनेक गझला, दादरा व ठुमरी ऐकण्याची संधी रसिकांना लाभली. निमित्त होते कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आणि आयएमए आर्ट्‌स सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘याद-ए-बेगम अख्तर’ या अनोख्या सांगीतिक मैफलीचे दि लखेचक आणि जादूई आवाजाने बेगम अख्तर यांनी गझल, ठुमरी आणि दादराच्या माध्यमातून रसिकांना मोहित केले होते.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार – सविस्तर बातमी

त्यांनी आपल्या गायनातून भारतीय शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत क्षेत्रात ठसा उमटविला होता. या मैफलीच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर, गायत्री सप्रे-ढवळे यांनी सादरीकरण केले. कलाकारांना अरुण गवई (तबला), कुमार करंदीकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. आयएमए आर्ट्‌स सर्कल यांच्या सहकार्याने डॉ. नीतू मांडके सभागृह, टिळक रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘दिवाना बनाना है तो दिवाना बना दे’, ‘दूर है मंझिल राहे मुश्किल’, ‘इश्क मे गैरते’, ‘कुछ तो दुनिया की इनायत ने’, ‘करेजवा मे लागे कटार’, ‘बलमवा तुम क्या जानो’, ‘मेरे हमनफस मेरे हमनवा’, ‘हमरी अटरिया पे आवो सावरिया’ अशा सुप्रसिद्ध रचना ऐकविल्या. गझल हे आंतरिक संगीत असून त्यात शब्दांची लयात्मकता, सौंदर्य महत्वाचे असते. गीतकार, गझलकार शकील बदायुनी, सुदर्शन फाकिर, अली अहमद जलिली अशा गझलकारांनी रचलेल्या रचना त्यातील वैशिष्ट्यपूर्ण शब्द त्यातून निर्माण झालेले भाव आणि ते गाताना योग्य उच्चारांचे महत्त्व असे विश्लेषण करत डॉ. सुनील देवधर यांनी अभ्यासपूर्ण निवेदनातून मैफलीत रंग भरले.

कलाकारांनी प्रभावीपणे सादर केलेल्या रचनांमधून शब्द, सूर आणि भावना यांचा अनोखा मेळ साधला गेला.प्रेम, विरह, नैराश्य, दु:ख आदी भाव प्रकट करणाऱ्या रचनांमधील सूर, नाद आणि शब्द रसिकांच्या मनात गुंजत राहिले. कलाकरांचा सत्कार श्रीरंग कुलकर्णी, डॉ. मोहन जोशी, डॉ. भुतकर यांनी केला तर डॉ. गीतांजली शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×