Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Electric Bus Fire : पुण्यात धावत्या ई-बसला आग

१७ प्रवाशांचा जीव बचावला

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती स्वारगेट परिसरात असलेल्या सेव्हन लव्ह्ज चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने, या दुर्घटनेत बसमधील सर्व १७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. ही घटना घडल्याने प्रवाशांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. गोंधळ आरडा ओरड सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. दरम्यान आगीची माहिती मिळतात अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य राबवले.

शेतकऱ्याकडून ६ हजारांची लाच घेणारा वनपाल अटकेत – सविस्तर बातमी

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक बस स्वारगेटकडे जात असताना अचानक वाहनातून धूर व ज्वाला दिसू लागल्या. चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली. याच दरम्यान अग्निशामक दल, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. संयुक्त प्रयत्नांमुळे प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले, त्यामुळे १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×