Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Maharashtra ACB Action : शेतकऱ्याकडून ६ हजारांची लाच घेणारा वनपाल अटकेत

लाचलुचपत

बारामतीतील माळेगाव परिसरात ‘एसीबी’ची कारवाई

marathinews24.com

पुणे – शेतात मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी ६ हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.
या प्रकरणी वनपाल जहीर सिराज शेख (वय ४७) याला अटक करण्यात आली. तो बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत करंजे येथे नियुक्तीस आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

लष्कर भागातील दुकानाचे कुलूप तोडून ३ लाखांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी

तक्रारदाराची कोऱ्हाळे खुर्द येथे चार हेक्टर शेतजमीन आहे. पावसामुळे शेतातील माती नीरा नदीत वाहून गेली होते. ते नदीपात्रातील माती शेतात टाकत होते. २६ सप्टेंबर रोजी वनपाल शेख याने हे काम बंद पाडले. संबंधित जागा वनविभागाच्या मालकीची असल्याचे सांगून कारवाई करण्याची भीती दाखवली. काम सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराने विनंती केली. तेव्हा शेख याने स्वतःसह एका महिला सहकाऱ्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी चार हजार रुपये त्याच दिवशी स्वीकारले. ‘उर्वरित सहा हजार रुपये दिल्याशिवाय काम सुरू करू नका’, असे त्याने सांगितले.

तक्रारदाराने १४ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रार आल्यानंतर शहानिशा करण्यात आली. त्यानंतर रविवारी (२५ ऑक्टोबर) माळेगाव आयटीआय’समोरील एका उपाहारगृहात तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना शेख याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सतीश वाळके, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस शिपाई प्रवीण तावरे, वैशाली माकर, अविनाश चव्हाण यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×