प्रत्येकाने कर्तव्यनिष्ठा, आत्मीय भावनेने सेवा द्यावी – उपसंचालक डॉ. किरण मोघे

प्रत्येकाने कर्तव्यनिष्ठा, आत्मीय भावनेने सेवा द्यावी - उपसंचालक डॉ. किरण मोघे

कॅमेरामन संजय गायकवाड यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

marathinews24.com

पुणे – पुणे विभागीय माहिती कार्यालयातील दूरदर्शन कॅमेरामन संजय विठ्ठल गायकवाड हे २७ वर्षाच्या सेवेनंतर नियत वयो मानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. साधनांच्या, परिस्थितीच्या, वेळेच्या अडचणी बाजूला सारुन संजय गायकवाड यांनी माहिती व जनसंपर्क विभागाप्रती कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व आत्मिय भाव एकटवून सेवा दिली, असे कौतुकोद्गार माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांनी काढले. प्रत्येकाने शासकीय सेवा बजावताना अशी भूमिका ठेवावी, असेही ते म्हणाले.

साहित्यिक, साहित्य प्रेमींच्या स्वागतासाठी सातारा नगरी सज्ज – सविस्तर बातमी 

सत्कार समारंभाला जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहायक संचालक सचिन गाढवे, गायकवाड यांची पत्नी संगीता व मुलगा सत्यम, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

उपसंचालक डॉ. मोघे म्हणाले, शासकीय काम करत असताना वेगळेपण ही आपली ओळख असते. ती ओळख प्रत्येकाने जपणे गरजेचे असते. तशी वेगळी ओळख श्री. गायकवाड यांनी जपली. त्यांनी सध्याच्या युगाला अनुरुप सृजनशीलता जपण्याचे काम केले. काही व्यक्ती सेवानिवृत्त होऊ नयेत असे वाटणे हेच त्यांच्या कारकिर्दीचे यश असते. असे यशस्वी ठरुन संजय गायकवाड सेवानिवृत्त होत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांच्या आदर्श घ्यावा अशी व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जायचे, त्यांनी भावी आयुष्यात कुटूंबाला, स्वत:ची कला विकसित करण्याला वेळ द्यावा, असेही ते म्हणाले.

जिल्हा माहिती अधिकारी पाटील म्हणाले, गायकवाड यांनी समर्पण भावनेने काम केले. शासकीय सेवा बजावत असताना त्यांच्या विनोद बुद्धीमुळे सहकाऱ्यांच्या कामाचा ताण हलका होत असे. समर्पित भावनेने काम करणारे व्यक्ती कार्यालयाचे आयकॉन ठरतात. सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात खूप शिकण्याच्या संधी असल्या तरी गायकवाड यांनी या क्षेत्रातच कार्य करत रहावे.

सेवेमध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. शासन सेवेत काम करताना यश एकट्याचे नसते. प्रत्येक काम हे सांघिक भावनेने केल्यास यश नक्की मिळते, असे श्री. गायकवाड अनुभव सांगताना म्हणाले. यावेळी सचिन गाढवे, विलास कसबे तसेच कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×