Breking News
फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावलेपुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्यासायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेचे उत्कृष्ट व्यवस्थापन; आंतरराष्ट्रीय सायकलपटूंकडून कौतुक

‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेचे उत्कृष्ट व्यवस्थापन; आंतरराष्ट्रीय सायकलपटूंकडून कौतुक

स्पर्धा अत्यंत सुरक्षित असून स्पर्धेचे व्यवस्थापन जागतिक दर्जाचे असल्याची दिली प्रतिक्रिया

marathinews24.com

पुणे – पुण्यात सध्या सुरू असलेली ‘युसीआय २.२’ श्रेणीतील ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा अत्यंत सुरक्षित असून स्पर्धेचे व्यवस्थापन जागतिक दर्जाचे असल्याच्या प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनी व्यक्त केल्या आहेत. स्पर्धा मार्गावर नागरिकांकडून होत असलेले उत्स्फूर्त स्वागत आणि प्रोत्साहन पाहून स्पर्धकांचा उत्साह अधिकच वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सह्याद्रीची शान ‘इंदू’: बजाज पुणे ग्रँड टूरचा नवा जागतिक चेहरा – सविस्तर बातमी 

युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (युसीआय), स्वित्झर्लंड यांच्या मान्यतेने जगभरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी प्रथमच भारतात आणि त्यातही पुण्यात ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून १९ जानेवारीपासून ही स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू आहे. या स्पर्धेत जगातील पाच खंडांतील २९ संघांमधील ३५ देशांचे १७१ नामवंत सायकलपटू सहभागी झाले असून विजेतेपदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याच्या व्यस्त कार्यक्रमादरम्यान आंतरराष्ट्रीय सायकलपटूंशी संवाद साधला असता त्यांनी स्पर्धा आयोजनाबाबत समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या.

युरो सायकलिंग ट्रिप्स संघाकडून सहभागी झालेले आणि फ्रान्सचे नागरिक असलेले सायकलपटू सीमीएन ग्रीन यांनी स्पर्धेच्या व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले. ही स्पर्धा अत्यंत संघटित पद्धतीने आयोजित करण्यात आली असून रस्त्यांची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धा मार्गावर नागरिकांकडून होत असलेले स्वागत आणि प्रोत्साहन प्रेरणादायी असून काही देशांतील स्पर्धांमध्ये वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो; मात्र पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक असूनही स्पर्धेदरम्यान वाहतूक व्यवस्थापन अतिशय चोख असल्याने ही स्पर्धा सुरक्षितपणे पार पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रीन यांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीबाबतही माहिती दिली. स्पर्धेच्या आठवड्यात शक्यतो तांदळावर आधारित आहार घेतला जातो, आवडते पदार्थ टाळावे लागतात. स्पर्धेनंतर विशेष प्रोटीन पावडर दिली जाते, तर घरी असताना आहार नियोजन वेगळे असते. जेवणात अधिकाधिक भाज्यांचा समावेश केला जातो. युरोप, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या खंडांतील शंभरहून अधिक सायकल स्पर्धांमध्ये आपण सहभागी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील ब्रिटीश आयलँड्स येथील नागरिक असलेले डेलॅन हॉपकिन्स हे रुजाई इन्शुरन्स विनस्पेस संघातर्फे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पुण्यातील नागरिक अतिशय प्रोत्साहन देणारे असून त्यामुळे स्पर्धकांना विशेष ऊर्जा मिळते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्या सहा वर्षांपासून ते व्यावसायिक सायकल स्पर्धांमध्ये सहभागी असून युसीआयच्या सुमारे तीनशे स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. स्पर्धा असो वा नसो, दररोज सायकलिंग करणे ही त्यांची सवय असून स्पर्धेनंतर मसाज, तसेच कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनयुक्त आहार घेतला जातो. मात्र आहाराबाबत मोठ्या प्रमाणात बदल करता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×