Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

रुग्णांची नेत्रविकार सेवा घडावी- उपमुख्यमंत्री अजित पवार

रुग्णांची नेत्रविकार सेवा घडावी- उपमुख्यमंत्री अजित पवार

डॉ. दुधभाते नेत्रालायचे उदघाटन

marathinews24.com

पुणे – डोळ्यांमुळे आपण सौंदर्य पाहतो. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात मोतिबिंदूसह डोळ्यांचे इतर आजार होत आहेत. आता उपचारांमध्येही ‘ए आय’ चा वापर होत आहे. डॉ. अनिल दुधभाते यांनी शून्यातून विश्व निर्माण करत नेत्राची काळजी घेण्यासाठी डोळ्यांच्या सर्वच आजारांवर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी १० हजार फुटाचे सुसज्ज सेंटर उभारले आहे, त्यांच्याकडून सर्वसामान्यांची नेत्रसेवा घडावी, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

द्राक्ष बागाईतदार संघाच्या मागण्यासाठी शासन सकारात्मक-उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी 

माणिकबाग, सिंहगड रस्ता परिसरात आरोग्यसेवेची नवी पर्वणी ठरू शकेल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटीना सेंटरचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, आमदार बापूसाहेब पठारे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, राष्ट्रवादीचे माजी नेते काका चव्हाण, अनिल गोसावी, पीडिसीसी बँकेचे दिगंबर दुर्गाडे, विकास दांगट, प्रसन्न जगताप, प्रशांत जगताप, अशोक हरणावळ वैदयकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, घरची प्रतिकूल परिस्थती असताना डॉ. दुधभाते जिद्दीने शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाले. ते गरिबीतून आल्याने ते गोरगरीब लोकांना सवलतीच्या दरांत सेवा देत आहेत. येथील प्रत्येक नेत्र वैद्यकीय साधनांच्या किमती एक ते पाच कोटींच्या दरम्यान व त्या अमेरिकन बनावटीच्या आहेत. डॉ. दुधभाते नेत्रालाय हे सर्वांना हक्काचे नेत्रालाय झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी मोफत नेत्रतापसणी करून काम करून सामाजिक भानही जपत डॉक्टरच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम पाहिले आहे. येथे लाखो लोकांचे नेत्रविकार दूर करण्याचे काम हे नेत्रालय करेल, अशा शुभेच्छा दिल्या.

चेन हॉस्पिटल सुरू करणार-डॉ. दुधभाते

डॉ. दुधभाते म्हणाले, “सन २०११ मध्ये सिंहगड रास्ता परिसरात नेत्रालाय सुरू केले होते. त्यानंतर आता १४ वर्षात स्वतःच्या या भव्य नेत्रालयाच्या वास्तूचे उदघाटन आपल्या सर्वांच्या सहकार्याने करू शकलो. आम्ही येथे अत्याधुनिक सेवा देणार आहोत. खासकरून कांटूरा लॅसिक तंत्रज्ञान येथे आहे. गेली चार वर्षे आम्ही ५०० मोफत नेत्र तापसणीद्वारे ५ लाख लोकांची मोफत नेत्र तपासणी केली. येथेही गरिबाला परवडेल अशा सेवा देणार आहे. कमीत कमी ५ हजार रुपयांमध्ये येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया असून येत्या काळात दुधभाते नेत्रालयाच्या चेन हॉस्पिटल सुरू करण्याची मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते डॉ. दुधभाते यांचे आईवडील धोंडीबा व पार्वती दुधभाते यांचा सत्कार करण्यात आला.

दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर विषयी

प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी तीन मजली अद्ययावत उपचार असलेल्या रुग्णालयाची उभारणी केली आहे. डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान, तपासणी व उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे हे केंद्र खास ठरणार आहे. पुणेकरांसह ग्रामीण भागातील रुग्णांनाही येथे उच्च दर्जाची नेत्रसेवा मिळणार आहे. सिंहगड रोड परिसरातील आरोग्यसेवेत भर घालणारे हे रुग्णालय पुणेकरांसाठी एक मोठे वरदान ठरणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×